जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खुशखबर; वाचा सविस्तर

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी “भुसावळ-पंढरपूर-भुसावळ” अशी विशेष मोफत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे गाडी 16 जुलै रोजी दु.1.00 वाजता भुसावळहुन पंढरपूरकडे रवाना होणार असून, 17 जुलै रोजी रात्री 10.00 वाजता पंढरपूरहुन भुसावळला येणार आहे. तरी जास्तीत जास्त वारकरी व भाविकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागामधून भाविकांचे पंढरीत आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी “भुसावळ-पंढरपूर-भुसावळ” अशी विशेष मोफत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे.

ही विशेष रेल्वे गाडी 16 जुलै रोजी दु.1.00 वाजता भुसावळहुन पंढरपूरकडे रवाना होणार असून, 17 जुलै रोजी रात्री 10.00 वाजता पंढरपूरहुन भुसावळला येणार आहे. तरी जास्तीत जास्त वारकरी व भाविकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे.