---Advertisement---
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील एका अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील मैत्रीच महागात पडली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रानुसार, पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलीने स्नॅपचॅटवर आलेली एका अनोळखी इसमाची रिक्वेस्ट शाळेतील मित्र असावा असे समजून स्वीकारली. त्यानंतर ते दोघेही चॅटिंग करत होते. दरम्यान आरोपीने मुलीला धमकावून तिला स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर ते व्हिडीओ स्नॅपचॅट तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल करत मुलीची बदनामी केली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीसात संशयित व्यक्तीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास केला जातो आहे.
---Advertisement---