हिंदू नववर्षापासून ‘या’ राशींचे उजळणार नशीब

तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। गुडीपाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरु होत आहे . २२ मार्चपासून नववर्षाची सुरवात होईल. ग्रहांचे रशिपरिवर्तन सांगत आहे की या वर्षी बुध राजा राहील. अशात शोभन संवत्सरारंभ या ५ राशीसाठी लाभकारक राहील. कारण या संवत मध्ये गुरु मेष राशीत मार्गी असेल. चला जाणून घेऊया हे नवीन वर्ष कोणकोणत्या राशीसाठी लाभदायक ठरेल.

मिथुन रास
हिंदू नववर्ष २०८० मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी असेल. या वर्षात गुरु तुमच्या राशीतून लाभस्थानात असेल, गुरूचे हे संक्रमण तुमच्यासाठी लाभाची परिस्थिती निर्माण करेल. काही महत्त्वाचे काम करून मानसिक समाधान मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये आयोजित करता येतील. या वर्षी तुम्हाला नफा मिळवून देण्यासाठी नशीबही साथ देईल. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल, त्यामुळे चिंता सोडून कामावर लक्ष केंद्रित करा.

सिंह रास
या राशीच्या लोकांसाठी शोभकृत संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्ष २२ मार्चपासून शुभ परिस्थिती घेऊन येत आहे. संवत्सराच्या सुरुवातीपासून फक्त एक महिन्यानंतर, गुरु तुमच्या भाग्यशाली स्थानी प्रवेश करेल आणि राशीचा स्वामी सूर्य देखील १४ एप्रिलपासून एक महिन्यासाठी त्याच्या उच्च राशीत, मेष राशीत असेल. अशा परिस्थितीत हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक संधी घेऊन येत आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. धनासोबत पुण्य मिळवाल.

तूळ रास
या राशीच्या लोकांसाठी वर्ष शुभ आणि फलदायी राहील. या संवत्सरात तुम्ही ढैय्यापासून मुक्त व्हाल आणि गुरूची शुभ दृष्टीही तुमच्या राशीवर राहील. अशा स्थितीत ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत होते त्यांचे अडथळे दूर होतील आणि विवाह शुभ होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील. व्यवसायात भागीदारी चांगली होईल आणि तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नाच्या दृष्टीनेही वर्ष चांगले राहील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि शुभ कामांवर होणारा खर्च वाढेल.

धनु रास
या संवत्सरमध्ये २२ पासून गुरु तुमच्या राशीत पाचव्या भावात प्रवेश करेल. गुरु ग्रहाच्या या संक्रमणामुळे धनु राशीतील या संवत्सरात एकामागून एक सुख प्राप्त होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल. ज्ञान आणि विज्ञानाचा विकास होईल.

मीन रास
या संवत्सरमध्ये मीन राशीचा स्वामी मेष राशीत जाईल, जो त्याच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी असेल. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी मीन राशीतील गुरूचे संक्रमण या संवत्सरामध्ये लाभ आणि प्रगतीच्या संधी प्रदान करेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रमोशन आणि चांगली वृद्धीही होऊ शकते. धर्माशी संबंधित प्रवास होऊ शकतो. या संवतात तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल आणि आर्थिक बाबतीतही चांगले नियोजन करता येईल.