फळे खायला आवडत नाही? मग ट्राय करा फ्रुट चाट

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। फळे खाण हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, असे घटक असतात. पण काही लोकांना फळे खायला आवडत नाही. पण फळांपासून बनलेले काही पदार्थ आपण नक्कीच खाऊ शकतो. तुम्ही कधी फ्रुट चाट हा पदार्थ ट्राय केला आहे का? हा पदार्थ ज्यांना फळं खायला आवडत नाही त्यांनी फ्रुट चाट नक्की ट्राय करावा. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
सफरचंद, संत्री, डाळिंबाचे दाणे, उकडलेले बटाटे, दही, लाल मिरची पूड,चाट मसाला, साखर.

कृती
सगळ्या फळांना स्वच्छ धुऊन , चौकोनी फोडी करून घ्याव्यात. दह्याच्या मिश्रणासाठी दही, लाल मिरची पूड, चाट मसाला  चवीनुसार  साखर घालून नीट फेटून घ्यावे. आपल्या चवीप्रमाणे मसाले कमी जास्त प्रमाणात वापरावेत. दह्याचे मिश्रण तयार आहे.आता फळांचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन ते वरखाली एकत्र करून घ्यावेत. या फळांवर दह्याचे मिश्रण घालून नीट हलक्या हाताने मिसळून घ्यावे .खाण्याआधी किमान ३० मिनिटे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे . चटपटीत फ्रुट चाट तयार !