---Advertisement---
मनोज माळी
तळोदा : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. परिणामी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, तळोदाच्या रोझवा प्लॉट गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा पुलाअभावी पुराच्या पाण्यातून काढावी लागली. गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून मृतदेह नदीच्या दुसऱ्या बाजुला नेला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
खत्री रेवाजी तडवी असे मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथे पुलाअभावी सदरची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नदीपलीकडे असल्याने स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. यामुळे स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी पुलाची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दोरीचा आधार घेत पार केली नदी
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रचंड प्रवाह, पाण्याच्या वेगवान होता. अश्या परिस्थितीतून मृतदेह नदीच्या पलीकडे न्यावा लागला.