---Advertisement---

Viral video : ‘यालाच म्हणतात संस्कृती’, सासू-सुनेच्या व्हायरल व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया

---Advertisement---

Viral video : सासू-सुनेचं नातं म्हटलं की भांडणं, टोमणे, वाद-विवाद असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ हे गृहीतक मोडीत काढतोय. या व्हिडिओमध्ये एका सासू आणि सुनेने जबरदस्त डान्स परफॉर्म करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. काही वेळा चिमुकल्यांचे क्युट डान्स असतात, तर कधी लग्नात नवरा-बायकोचे जबरदस्त परफॉर्मन्स असतात. मात्र, या वेळी चर्चेत असलेला व्हिडिओ थोडा वेगळा आहे. nakti_family0803 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओत एका घरात सासू आणि सुनेने ‘काखेत कळसा गावाला वळसा’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. दोघींनी पारंपरिक साड्या नेसलेल्या असून त्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद झळकत आहे. काही वेळातच त्यांच्यात आजोबांची एंट्री होते आणि मग हा डान्स अजूनच मनोरंजक होतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आजी-सुनेच्या तालबद्ध नृत्याचं कौतुक केलं, तर काहींनी त्यातली संस्कृती जपल्याची दखल घेतली.

https://www.instagram.com/p/DFsaG50PEiV/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

एका युजरने लिहिलं, “एवढं नाचत असताना पदर खाली पडू दिला नाही, यालाच म्हणतात संस्कृती!”

दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “आजींनी जबरदस्त डान्स केला, त्यांच्या एनर्जीला सलाम!”

आणखी एका व्यक्तीने लिहिलं, “अशी सासू-सुन प्रत्येक घरात हव्यात, प्रेम आणि आनंद दिसतोय!”

व्हिडिओ व्हायरल, पण पडताळणी आवश्यक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. मात्र, त्याच्या सत्यतेची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून हा व्हिडिओ वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. याचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment