मुंबई : मनसेकडून मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यात राज ठाकरे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. यावरुन उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या बॅनरबाजीत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे.
मनसेच्या या मन की बातवर राऊत म्हणाले, “या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये.” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.