जी-२० पंतप्रधान मोदींची घोषणा : आफ्रिकन युनियनला दिले स्थायी सदस्यत्व

नवी दिल्ली : जी-२० परिषदेच्या (G-20 Summit)  बैठकीच्या सुरुवात करतानाच एक मोठी घोषणा करण्यात आली. आफ्रिकन महासंघाला (African Union gets G-20 Membership) G-२० राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदींनी (PM Modi) जाहीर केले.

यानंतर आफ्रिकन संघाचे अध्यक्ष अझाली असोउमानी यांचे सर्वांनी स्वागत केले. त्यामुळे आता यापुढे G-20 नव्हे तर G-21 म्हटले जाईल.

आफ्रिकन महासंघाला जी-20 देशांचे स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधानांनी सर्व सदस्य देशांसमोर प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांनुमते सहमती मिळाल्यानंतर PM मोदींनी आपल्याजवळील ‘गॅवल’ तीन वेळा वाजवून आफ्रिकन संघाच्या अध्यक्षांना पुढे आमंत्रित केले.

 

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर परराष्ट्र मंंत्री जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना आपल्या नवीन स्थानापर्यंत पोहोचवले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी मिठी मारुन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.