नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. शरद पवार हे म्हणजे जपानी गुडिया, जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवार यांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळतं’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये भाजपच्या नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. नितीन गडकरींनी पहिलयांदाच शरद पवारांवर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी बोलताना नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. गडकरी म्हणाले की, ‘थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्टट, ‘आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही’, पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो अशी मिश्लिक नितीन गडकरी यांनी केली आहे.