नागपूर : येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली हे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे आव्हान पेलण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान पदावरुन काँग्रेस नेत्याने मोठा दावा केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ५० खासदार कमी पडतील. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्या पंतप्रधानपदाच्या संधी वाढतील, असा दावा पटोले यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा म्हणजे, त्यांनी निवडणुकीपुर्वीच हार मानली असल्याचे भाजपाने म्हटले आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा विषय होणार नाही, हेच काँग्रेसने कबूल केले असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन, गडकरी यांच्या अशाच घोषणा होत्या. पण आता संधी दिसताच गडकरी सरसावले आहेत. ५० खासदार कमी पडले तर नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते, असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्या वाद सुरू झाला, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.