मुंबई : गेल इंडिया लिमिटेडने (GAIL) विविध ट्रेडमध्ये ४७ एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदं सिव्हिल, केमिकल, बीआयएस आणि गेलटेल टीसी/टीएम अशा विविध ट्रेडमध्ये भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड GATE-2023 च्या गुणांच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी १५ मार्च २०२३ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार गेलच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर अर्ज करू शकतात.
सर्व विषयातील एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी १५ मार्च रोजी कमाल वयोमर्यादा २६ वर्षे असावी. अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांसाठी वयाची अट 5 वर्षे आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी ३ वर्षे शिथिल करण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवारांना ए-२ ग्रेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून एक वर्षाच्या ट्रेनिंग कम प्रोबेशन पीरियडमध्ये ६०,००० – १,८०,०००/ रुपयांच्या मूळ वेतनावर ६०,०००/- च्या वेतनश्रेणीत ठेवले जाईल. ट्रेनिंग व प्रोबेशन पीरियडनंतर त्यांना ए-२ ग्रेड अंतर्गत ६०,००० – १,८०,०००/- वेतन दिले जाईल.
भरावयाच्या पदांची संख्या
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) – २० पदे
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल) – ११ पदे
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल) – ८ पदे
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस) – ८ पदे
एकूण पदांची संख्या – ४७ पदे
शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल): किमान ६५% गुणांसह केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल): किमान ६५% गुणांसह सिव्हिलमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस)): किमान ६५% गुणांसह कम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरींगची डिग्री किंवा किमान ६०% गुणांसह बॅचलर डिग्री आणि किमान ६५% गुणांसह कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये (चउ-) ३ वर्षे मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल टीसी/टीएम): किमान ६५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमधील इंजिनीअरींगची डिग्री असणं आवश्यक आहे.