गाैतमी पाटील म्हणतेय मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या

पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना मलाही कुणही प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. अनेकांना आज आरक्षणाची गरज भासत आहे. ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना सरकारने आरक्षण द्यावं, असं ती म्हणाली.

गौतमी पाटीलने नृत्य कार्यक्रमांमधून थोडासा मोकळा श्वास घेऊन चित्रपटात क्षेत्रात आपलं नशीब आजमविण्याचं ठरवलं आहे. येत्या १५ तारखेला तिची प्रमुख भूमिका असलेला ‘घुंगरु’ हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येतोय. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये गौतमी व्यस्त आहे. आज पुण्यात पत्रकारांशी याच अनुषंगाने गौतमीने संवाद साधला. यावेळी तिने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही उत्तर दिलं.

होय, मलाही कुणबी प्रमाणपत्र हवं!

मराठा आरक्षण प्रश्नावर तुझं काय मत आहे तसेच तुला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी गौतमीला विचारला. त्यावर ती म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालंच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय.

मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय”

मराठा आरक्षण प्रश्नावर तुझं काय मत आहे तसेच तुला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी गौतमीला विचारला. त्यावर ती म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालंच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय”

आमच्यातून कोण फुटलं तर आम्ही त्याला गद्दार म्हणत नाही!

गौतमी पाटील हिच्यासोबतच ठुमके लगावणारी नृत्यांगणा हिंदवी पाटील हिचीही प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. याबद्दल गौतमीला विचारण्यात आलं. त्यावर गौतमी म्हणाली, “मी अकरा वर्षापासून नृत्याचे विविध कार्यक्रम करते. अनेक मुली माझ्यासोबत नृत्य करतात. बऱ्याच मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं देखील चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार म्हणत नाही. उलट त्यांचं चांगलं होऊ दे, असंच आम्ही म्हणतो.”

मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही

गौतमीची राज्यभरात क्रेझ आहे. ती जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी होते. त्याच पार्श्वभूमीवर गौतमी राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी तिला विचारला. त्यावर ती म्हणाली, “मला राजकारणात रस नाही, मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही”