तरुण भारत लाईव्ह । १५ मे २०२३। ज्योतिशास्त्रानुसार गजकेसरी योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. यावर्षी म्हणजेच २०२३ ला १७ मे रोजी गजकेसरी योग जुळून येत आहे. या राजयोगानुसार हत्तीवर सिंहाची स्वारी असते. यामुळे हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या स्थितीचा राशीचक्रातील तीन राशींवर सकारात्मक परिणाम होईल. तर कोणत्या आहेत तीन राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे स्तोत्र निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
मिथुन रास
या राशीच्या जातकांना गजकेसरी योग लाभदायी ठरेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आत्मविश्वास दुणावेल. वाद होईल असं या काळात वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.
तूळ रास
या राशीच्या जातकांना गजकेसरी योगाचा फायदा होईल. तूळ राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.