---Advertisement---
जळगाव : लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात येत आहे . बाप्पाला निरोप देण्यासाठी शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे. महापालिका, पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांनी विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. आज सकाळी १० वाजता मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. तत्पूर्वी सर्व गणेश मंडळे सुरुवातीला शिवतीर्थ मैदानावर एकत्र आले होते. यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात प्रारंभ झाला.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहे. यात काही मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही मिरवणूक कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, मनपा, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरूजी चौक, घाणेकर चौक, भिलपुरा चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, सुभाष चौक, पांडे चौक, सिंधी कॉलनी, तांबापुरा, आणि शिरसोली नाका या प्रमुख मार्गावरून मेहरूण तलावाकडे जात आहे.

जळगाव जनता सहकारी बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या मिरवणुकीत बँकेचे कर्मचार सहभागी झाले होते. विठ्ठल – रुखमणीच्या वेषातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माउली माउली रूप तुझे या गीतावर महिला कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी देखीलढोल ताशांच्या गजरात ठेका धरला होता. यासोबतच वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता. यासोबतच केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते
सात ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र
जळगाव महानगरपालिकेने शहरात सात ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची केंद्र तयार केले आहेत. यात महानगरपालिका लाठी शाळा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, मनपा पांजरा पोळ शाळा जुने जळगाव, सागर पार्क, पिंप्राळा निमडी शाळा,
निमखेडी गट नंबर १०१ येथील पाण्याची उंच टाकी, नाभिक समाज सभागृह शिवाजीनगर, श्री साईबाबा मंदिर मेहरूण येथे मुर्ती संकलित करण्यात येणार आहे.
---Advertisement---

४५ जणांचे पथक
महानगरपालिकेने गणेश घाट येथे घरगुती मूर्ती व लहान मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक जीव रक्षक बोट, ४५ व्यक्तींचे पथक, ५ लाकडी तराफ 1. प्रकाश व्यवस्था व बारागेटिंग व्यवस्था केलेली आहे. मेहरूण तलाव येथे मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी सेंट टेरेसा हायस्कूल पासून पुढे तलावाच्या काठावर व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी ५ तराफे, ४ क्रेन, २ राखीव क्रेन, ४५ कामगारांचे पथक, प्रकाश व्यवस्था केलेली आहे.