---Advertisement---
धुळे : शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नकट्या याच्यावर अखेर एमपीडीएअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी त्याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना धोकादायक गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक पाटील यांनी जावेद नकट्याविरुद्ध (वय ३७) प्रस्ताव तयार केला.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यामार्फत हा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे गेला. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी शिफारस केल्यानंतर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिका यांनी जावेद नकट्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.