न्हावी येथे गांजाचा साठा जप्त, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई

---Advertisement---

 

भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने फैजपूर उपविभागात न्हावी येथे धडक कारवाई करत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोघांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा, किंमत १ लाख ९४ हजार ३४० रुपये इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर उपविभागात गस्त घालत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, न्हावी शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या घरात दोन व्यक्ती अवैधरित्या गांजा साठवून विक्रीसाठी ठेवले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाणे, यावल पोलीस ठाणे व एलसीबीच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.


या कारवाईत रगन सुकराम वारेला (वय ३२, रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. न्हावी) व अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी ( वय २७, रा. सिध्दवलपुर, एलहंका, बेंगलुरु कर्नाटक) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला असून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिकारी अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे पोनि. रंगनाथ धारबळे, फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि. रामेश्वर मोताळे तसेच एलसीबीचे ठाण्याचे प्रभारी पोउपनि. शरद बागल, निरज बोकील, विनोद गाभणे यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---