Video : प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार ! मनपा इमारतीचा परिसरच अस्वच्छतेच्या विळख्यात,

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिका गेल्या पाच वर्षांपासून ठेकेदारामार्फत करून घेत आहे. दरम्यान, पूर्वीच्या ठेकेदाराचा मक्ता संपल्याने २ सप्टेंबरपासून हे काम बीव्हीजी कंपीनीकडे देण्यात आले आहे. यावेळी घंटा गाडीच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत असते. यात कचरा करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले जाते. परंतु, दिव्या खाली अंधार या उक्तीनुसार महापालिकेची १७ मजली प्रशाकीय इमारती शेजारील खाऊ गल्लीत साफसफाई होत नसल्याने कचरा साचून दुर्गंधी येत असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार ते अग्निशमन दलाचे कार्यालय दरम्यान गोलाणी मार्केट शेजारी हा रस्ता आहे. या रस्त्यावर गोलाणी मार्केटमधील काही व्यापारी कचरा टाकत असतात. परंतु, या परिसराची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी येत आहे. यातच या रस्त्यावरील दत्त मंदिर देखील कचऱ्याच्या विळख्यात आले आहे. मात्र, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

गोलाणी मार्केट मधील काही व्यापारी उरलेला भाजीपाला, फुले, नासके फळ, तसेच इतर कचरा टाकतांना दिसून येतात. हा कचरा महापलिकेकडून उचलला जात नाही. यामुळे कचरा कुजून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात गटार आहे. ही गटार नेहमीच तुडुंब भरलेली असते. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत. या घाण पाण्यातून वाहनधारक आपले वाहन घेऊन जावे लागते. या परिसराची नियमित साफसफाई होत नाही. त्यातच काही नागरिक या गटारीत लघुशंका करतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.

---Advertisement---

 

गोलाणी मार्केट हे मोबाईल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर भाजीपाला विक्रते, फुल विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. ते त्यांचा कचरा या गल्लीत टाकत असतात. यसोबतच मोबाईल मार्केट असल्याने मोबाईल दुकानातील कचरा येथे टाकला जातो. यात खराब झालेले मोबाईल पार्टचा देखील असतात. येथे अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. या कार्यलयासमोरच गटारीचे पाणी वाहत असते. गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावरील गाळ्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचत असते. यातून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---