तरुण भारत लाईव्ह । नंदकिशोर काथवटे। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राला, तसेच कड्या-कपा-यांनी आणि त्यातून वाहणा-या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राला, मावळ्यांच्या पोलादी मनगटाच्या स्फूर्तीला आता ख-या अर्थाने शिंदे सरकारने न्याय दिला आहे. garja maharashtra maza ‘दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा,’ ही मराठी मनांना चेतवणारी गर्जना आता सर्वांना ऐकू येणार असून, मराठी माणसांच्या अंगी स्फूर्ती व प्रेरणा निर्माण करण्याचे काम यापुढे राज्यगीताच्या रूपाने होईल. garja maharashtra maza नीती चांगली असली की, निवड देखील उत्तम होते आणि निवड उत्तम झाली की मग पुढील कार्यदेखील उत्तमोत्तम होत जाते. अतिशय सुंदर गीताची निवड राज्यगीत म्हणून शिंदे सरकारने केली आहे.
शिवाजी महाराजांच्या शौर्याला नमन करून, नागपूरचे प्रसिद्ध कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ garja maharashtra maza या गीताची राज्यगीत म्हणून केलेली निवड म्हणजे राजा बढे यांचा राज्य सरकारने केलेला सन्मानच होय. महाराष्ट्राचे पाईक म्हणवून घेणा-या स्वार्थी राजकारण्यांना आजवर जे जमले नाही, ते शिंदे सरकारने करून दाखविले असून, या राज्यगीतामुळे शिवाजी महाराजांचे शौर्य घराघरांत पोहोचेल आणि मराठी माणसाच्या नसानसांत हे गीत भिनेल. स्फूर्ती व चेतना जागविणा-या या गीताच्या निवडीमुळे नागपूरकरदेखील सुखावले आहेत. garja maharashtra maza नागपुरात वास्तव्य असताना कविवर्य राजा बढे यांनी हे गीत रचले व या गीताला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले. शाहीर साबळे यांनी, त्यांच्या पहाडी व बहारदार आवाजाने garja maharashtra maza ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला अजरामर केले. आजवर राज्याचे अधिकृत असे कुठलेही राज्यगीत नव्हते. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘जय जय महराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून निवडण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १९ फेब्रुवारीपासून हे गीत राज्यगीत म्हणून अंमलात येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठरावीक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचविले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राजा बढे यांच्या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधीच हे गीत राज्यगीत म्हणून निवडले जाईल, अशी घोषणा केली होती. garja maharashtra maza त्यावर आता मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व त्यानंतर महाराष्ट्राचे हे गौरव गीत राज्यगीत म्हणून गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी परिपाठ, प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत यासोबतच राज्यगीत वाजविले व म्हटले जाईल. garja maharashtra maza राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम आदींमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून गाण्यास व वाजविण्यास मुभा राहील.
राज्यगीत वाजविताना काही नियमांचे पालनदेखील करावे लागणार आहे. राज्यगीत सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा, बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्धांना मात्र सावधान उभे राहण्यापासून सवलत असेल. garja maharashtra maza राष्ट्रगीताबाबतीत जे तारतम्य बाळगण्यात येते तसेच राज्यगीताच्या बाबतीतही बाळगण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आता राज्यगीताचा समावेश केला जाणार आहे. राजा बढे यांनी रचलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ garja maharashtra maza या गीतातील दोन चरणांचे गीत राज्यगीत म्हणून निवडण्यात आले असून, हे गीत १.४१ मिनिट अवधीचे आहे. सीमा आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या तोंडी असलेले कवी राजा बढे यांचे स्फुलिंग चेतवणारे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीताच्या रूपाने आता अजरामर झाले आहे.