---Advertisement---

Parola News : गौरव निकम झाला गावातील पहिला ‘डॉक्टर’

---Advertisement---

पारोळा : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील मुख्य लिपिक व मालती पाटील यांचा मुलगा डॉ. गौरव याने जूहू, मुंबई येथील सुप्रसिध्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली.

आर्थिक परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या क्षेत्रात एक उज्ज्वल आदर्श निर्माण केला. गौरव निकम याने एम.बी‌.बी.एस.ची पदवी प्राप्त केली.
मेहू या छोट्या गावी जन्मलेला गौरव हा गावातील पहिला डॉक्टर झाला. त्याने हे यश त्याच्या अथक परिश्रमाचा आणि कुटुंबीयांच्या आशिर्वादाचा परिणाम असल्याचे सांगितले.

गौरवच्या कुटुंबातील परिस्थिती खूपच संघर्षपूर्ण होती. त्याची आई गृहिणी आणि वडील यांच्या मेहनतीमुळे त्याला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. घरातील आर्थिक परिस्थिती जरी आव्हानात्मक असली तरी गौरव याने कष्ट, समर्पण आणि दृढनिश्चयाच्या जोरावर हे यश मिळवले.

गौरव याने आपल्या शिक्षणाच्या सुरुवातीला ठरवले होती की, आयुष्यात डॉक्टर व्हायचे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक अडचणीवर मात केली. कधी तरी शिकण्यासाठी घरापासून दूर जावे लागले हे सर्व खूप कठीण होते. पण कुटुंबीयांची सदैव साथ आणि स्वतःच्या जिद्दीमुळे सर्व संघर्ष पेलून, त्याने एम.बी.बी.एस. ची पदवी प्राप्त केली.

गौरव च्या या यशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे, तर मेहू गावातील आणि आसपासच्या परिसरातील अनेक मुलांना प्रेरणा मिळाली आहे. “कठीण परिस्थितीतून यश मिळवणे हे केवळ मनाची शक्ती आणि मेहनतीवरच अवलंबून आहे,” असे गौरव नम्रपणे सांगतो. डॉ.गौरव ला पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यामुळे, कुटुंबीयांसह मेहू गावासाठी ही एक मोठी गर्वाची व अभिमानाची गोष्ट आहे.

संपूर्ण कुटुंबीय, शिक्षक, आणि इतर सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करत गौरवने सांगितले की, “आर्थिक परिस्थिती खूप कठीण होती, पण कधीही आत्मविश्वास न गमावता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.”यशामुळे हेच सिद्ध होते की, शाश्वत प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळविण्याचा मार्ग मिळू शकतो. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार वसंतराव मोरे, सचिव पराग मोरे,संचालक रोहन मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, आप्तेष्ट ,नातेवाईक मित्र परिवारातर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment