---Advertisement---

जळगावात शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत ? रंगलेल्या चर्चांवर ना. पाटलांनी दिली प्रतिक्रिया

---Advertisement---

जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र, या कार्यालयात भूत असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यात शिवसेना ही एक चळवळ असून, जनतेच्या मनातील ताकद असल्याचे गौरवद्‌गार त्यांनी काढले. आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

भूत असल्याच्या रंगलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया

तसेच कार्यालयात भूत असल्याच्या रंगलेल्या चर्चांवरही भाष्य केले. यावेळी त्यांनी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच 4 जून रोजी या कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन होईल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मेळाव्याच्या सुरुवातीस शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आकाश सोनवणे, रवींद्र पवार, अनिल राठोड, पंकज चव्हाण, ओम पवार, शुभम सोनवणे, दादू जाधव यांच्यासह वकील संघटनेचे अॅड. आशिष पाटील, धीरज पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

लाडकी बहीण योजनेचे पैसे शिंदेंनी सुरू केले

लाडकी बहीण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे यांनी सुरू केले, असे सभासद नोंदणी करताना महिलांना सांगा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment