---Advertisement---

गिरीश बापटांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील – PM मोदी

---Advertisement---

नवी दिल्ली : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश महानज यांच्या निधनाने आज महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. एक दिलखुलास, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गिरीश बापट यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार असताना त्यांनी लोककल्याणाचे प्रश्न मांडले. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्याचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.

बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते नेहमी समोर असायचे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment