Girish Mahajan : ‘नौटंकीबाज जितेंद्र आव्हाड’, बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून महाजनांची टीका

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार, २९ रोजी नाशिक येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप आहे. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी फेसबुकवर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलीय.

काय म्हणाले आहेत गिरीश महाजन ?
केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा उदो उदो करायचा आणि निवडणुका झाल्यावर त्यांचा फोटो फाडून पायदळी तुडवायचा ?’ अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.

ते पुढे म्हणाले की, बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र भूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून विकृत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली. आपण काय चाळे करतोय याचे भान आव्हाडांना दिसत नाही, अशीही टीका त्यांनी केली.

दरम्यान, भावनेच्या भरात मनुस्मृती त्यावर लिहिलं होतं म्हणून ते पोस्टर फाडले. त्यावर बाळासाहेबांचा देखील फोटो होता. मला हे लक्षात आलं नाही. यावरुन विरोधक राजकारण करणारच. माझ्या हातून चूक झाली. मी याबाबत माफी मागतो. मनुस्मृती दिसलं म्हणून मी पोस्टर फाडलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून तो फाडला असं कोणी म्हणत असेल तर तो मुर्ख आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.