भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे वारंवार सांगणारे राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी ‘होय, मी भाजपमध्ये जात आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यांचा काही दिवसांत दिल्लीत घरवापसी सोहळा होणार आहे.
दरम्यान, भाजपच्या मार्गावर असलेल्या एकनाथ खडसे यांची विधान परिषदेतील आमदारकी शरद पवार परत घेणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच शरद पवार यांनी आमदारकी परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पवार साहेबांचं आणि एकनाथ खडसे साहेबांचं प्रेम हे अधिक असेल. म्हणून त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितलं असेल. पवार साहेबांचं मोठं मन आहे, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.