Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांनी लाडक्या बहिणींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण

जामनेर : देशभरात आज बहिण-भावाचा सण ‘रक्षाबंधन’ साजरा केला जातोय. या सणाच्या पूर्वसंध्येला राज्यात ठिकठिकाणी ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर येथे हा कार्यक्रम  ऑनलाईन पद्धतीने दाखवण्यात आला. मतदार संघातील असंख्य माता-भगिनींनी उपस्थित लावली. यावेळी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेत ‘रक्षाबंधन सण’ मोठ्या उत्साहाने साजरा केला.

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. जामनेर मतदार संघातील असंख्य माता-भगिनींनी उपस्थित लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून लाडक्या बहिणींची संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले , विकसित भारत घडवायचा असेल भगिनींना मुख्य धारेत आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, स्वत:च्या पायावर उभं राहू शकणार नाही तोपर्यंत भारत विकसित होणार नाही. त्यामुळे मोदी सरकारने महिला केंद्रीत धोरण पुढे आले आहे.

महिलांच्या जीवनात परिवर्तन होतंय. आता पुढच्या काळात २०२७ नंतर जितक्या निवडणुका होतील तिथे महिला प्रतिनिधित्व मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत १०० महिला प्रतिनिधी पाहायला मिळतील तर लोकसभेत त्याहून दुप्पट महिला प्रतिनिधित्व दिसेल” असं त्यांनी यावेळी सांगितले.