Maharashtra Politics : खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी खंत माडंली आहे. दरम्यान, अजित पवारांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यासोबत अलेल्या ९ आमदारांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात खातेवाटप करण्यात आलेलं होतं. विशेषतः यामध्ये सर्वात जास्त फटका मंत्री गिरीश महाजन यांना बसला होता. याच मुद्द्यावरुन काल पुण्यात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर खंत माडंली.
अजित पवार गटाला खातेवाटप करताना भाजपकडची सहा खाती आणि शिंदे गटाकडील तीन खाती अशी ९ खाती देण्यात आलेली होती. गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तीन महत्त्वाची खाती होती. त्यांच्याकडीन दोन खाती काढून घेण्यात आली होती.
गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि तिसरं क्रीडा आणि युवक कल्याण; अशी तीन खाती होती. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची दोन खाती अजित पवार गटाला देण्यात आली. महाजन यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण हे खातं हसन मुश्रीफ यांना मिळालं तर क्रीडा व युवक कल्याण हे खातं मंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आलं. तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज खातं उरलं. याच मुद्द्यावरुन काल पुण्यात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर खंत माडंली.
काय म्हणाले आहे मंत्री गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडे क्रीडा खात्याचा कारभार होता. एकनाथ शिंदे यांनी मला क्रीडा मंत्री केलं होतं. राज्यात अनेकांना आनंद झाला कारण एका खेळाडूकडे हे खातं सोपवण्यात आलं होतं. पण दादा (अजित पवार) आपल्याकडे आले. त्यांनी माझं खातं काढून घेतलं. त्याचं कारण मी आता सांगत नाही ते मला आणि दादांना माहिती आहे. असं म्हणत त्यांनी एकप्रकारे तक्रारच केली.