जळगाव : येणाऱ्या काळात जामनेर शहराची शोभा वाढवणारी सोनबर्डी व सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शन व पर्यटनाच्या लाभ मिळणार आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार आणि नागपंचमीनिमित्त जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदीरात मंत्री गिरीश महाजन व पत्नी साधना महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी त्यांनी राज्यातील जनता सुखी समृद्धी हो व चांगल्या प्रकारे पाऊस पडो, अशी कामना केली तसेच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोमेश्वर महादेव मंदिरावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.