जळगाव : भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ खडसेंनी महाजनांबद्दल मोठं वक्तव्य करत माझ्यामागे ईडी लावली म्हणून गिरीश महाजन यांच्यामागे मोका लागला असं म्हणाले होते. आता यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसेंचं डोकं तपासायला लागणार आहे. एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सतत ईडी मोक्का लावला. हे लावलं, ते लावलं. आपला जावई जेलमध्ये अडकून आहे. ते आधी पाहा… एकनाथ खडसेंना कोर्टाने एवढं ठोकलं की हा माणूस किती चोर आहे हे दाखवून दिलं,असं गिरीश महाजन म्हणालेत.
अजून एक दूध संघाच्या चोरीचं प्रकरण पुढे आला आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. आपण किती मोठे चोर आहोत हे लपवण्यासाठी हवेत गोळीबार करायचा. मला जास्त बोलायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर लोक तुमच्या तोंडाला काळ लावतील, असं म्हणत महाजनांनी खडसेंवर टीका केली आहे.
तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचं दुःख मलाही आहे,” असा पलटवारही मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.