तरुण भारत लाईव्ह । मुंबई : ठाण्याच्या सभेत २९ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांनी अतिशय बालिश असं स्टेटमेंट केलं आहे. पंतप्रधानांसंदर्भात बोलताना आपण कुणावर बोलतोय याचं थोडं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होत. बाहेरील देशांमध्ये गेल्यावर लोक ‘इंडिया मोदीजी’ असं म्हणतात याच्याबद्दल सर्वांना गर्व वाटायला हवा तसेच तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्याच सांगता पण जर तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेस सोबत जायचं होतं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केली. त्यामुळे तुम्ही निवडून आलात, असे ही गिरीश महाजन म्हणाले.
त्यामुळे ठाकरे यांच्या बद्दल आता काय बोलावं हेच समजत नाही. कोरोनाच्या काळात मंदिर कुणाच्या सांगण्यावरून बंद होती. भाजपने आंदोलन व उपोषण केली रस्त्यावर उतरलो तेव्हा तुम्ही मंदिर खुली केली, अशी टीका ही महाजन यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.
तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून आणून दाखवा.तुम्ही मोदींना हुकूमशहा म्हणतात हुकूमशाही कशाला म्हणतात ते माहित आहे का? तुमच्या हुकूमशाहीमुळे 55 पैकी आठ-दहा आमदार सुद्धा राहिले नाही. 18 पैकी चार खासदार उरले नाहीत.आमदार आणि मंत्र्यांना तुम्ही भेटला नाही म्हणून लोक तुमच्या सोबत राहिले नाहीत, असे जोरदार प्रत्युत्तर हे गिरीश महाजन यांनी ठाकरे यांना दिले.
त्याचबरोबर कोरोनातील परिस्थितीवर बोलताना,कोरोना बद्दल तुम्ही काय सांगता मृतदेहांच्या लपेटणाऱ्या बॅगमध्ये व रेमडेसिवर इंजेक्शन मध्ये तुम्ही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तुम्ही केला.कॅगची चौकशी लागली आणि आज तुमचं पितळ उघड पडलं आहे; आणि म्हणून तुमची आग पाखड सुरू आहे.
उद्धवजी करुणाच्या काळामध्ये जेव्हा लोकांना कॉट व रेमडेसिवर मिळत नव्हतं तेव्हा आपण कुठे होता? ,असा सवाल ही महाजनाने ठाकरेंना विचारला.तसेच त्यावेळी माझं परिवार म्हणत एक दिवस तरी बाहेर पडला का? उलट त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले, दोन वेळा त्यांना कोरोना झाला.तरी एकही दिवस ते घरी बसले नाहीत, आम्हीही रस्त्यावर होतो. तुम्ही त्यावेळी कुठे होता आज तुम्ही कुठल्या अधिकाराने विचारता?लोकांना सगळं माहित आहे .आता तुमच्यासोबत म्हणूनच फक्त शिल्लक सेना उरली आहे,असे ही महाजन म्हणाले.