मतदानाचा टक्का वाढेल, गिरीश महाजनांचा विश्वास, सहकुटुंब केलं मतदान

#image_title

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.

२८८ विधानसभेच्या जागांसाठी ७ हजार ०७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

हा आकडा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघांसाठी 3 हजार २३९ उमेदवार रिंगणात उतरले होते.