political earthquake : गिरीश महाजनांचं मोठं विधान १५ ते २० दिवसांत मोठे राजकीय भूकंप

political earthquake : राज्यात २०१९ नंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. २०२२ साली जून महिन्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंसह काही आमदार बाहेर पडले आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. यानंतर २०२३ साली जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवारांसह काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन Girish Mahajan म्हणाले, “कुठल्या पक्षात काय घडतं, हे आपल्याला कळेल. पण, निवडणुकीच्या आधी म्हणजे १५ ते २० दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पाहायला मिलतील.”
गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. “शरद पवारांनी एक-दोन जणांना निवडून आणून दाखवावं. शरद पवारांकडे पक्ष राहिलेला नाही. शरद पवारांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काळजी चिंता करावी,” असा खोचक सल्ला महाजनांनी दिला आहे.