जामनेर । मंत्री गिरीश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठय़ा उत्साहात जनसागर उसळला. भव्य मिरवणूक काढत गिरीश महाजन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महायुती पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तत्पूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते शिवतीर्थ मैदानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी महाराजांची आरती करून पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
माझ्यावर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी असून तालुक्यात सगळे कार्यकर्त्यांना भरोशावरती राहणार आहे. आपण केलेल्या विकासकामांचे लोकांना पटवून सांगणे व आपण सगळे गिरीश भाऊ आहात हीच भावनात मनात ठेवून मतदारांपुढे जाणे व मोठ्या संख्येत आलेल्या जनसागर रुपी आपण दिलेले आशीर्वाद तीस वर्षापासून आपले ऋणानुबंध आहे. हे असेच टिकून ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील व यापुढील माझे जीवन हे लोकसेवेसाठी समर्पित असेल, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
राघोबा पाटील मंगल कार्यालय येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत ना. गिरीश महाजन तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे हे देखील रॅलीत सहभागी झाले.
मंत्री गिरीश महाजन यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत थोरामोठ्यांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीमध्ये पक्षाच्या तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता. नामांकन रॅली राघोबा पाटील मंगल कार्यालय शिवतीर्थ चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील चौक येथे विसर्जित करण्यात आली. नामांकन रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले.
यावेळी जमलेल्या जनसागरला संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन विरोधकांवर कडाडले जे कालपर्यंत आपल्या भाषणात उभे राहून मंत्री गिरीश महाजन यांचे विकास कामाचे गुणगान करत होते तेच लोक आज विरोधात बोलतात याच्यावरती कोण विश्वास ठेवणार म्हणून जामनेर ची जबाबदारी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती देऊन महाराष्ट्रात फिरणार आहे व आलेल्या जनसागरांचा त्यांनी मनापासून धन्यवाद दिला व या जनतेच्या आशीर्वादानेच आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या कन्या यांच्यासह हजारो लाडक्या बहिणी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.