मैत्रिणीसोबत प्रियकराला रंगेहाथ पकडलं; यशोदा संतापली अन् घेतली बाजूचीच रूम, मग पुढे जे घडलं…

---Advertisement---

 

Yashoda and Vishwanath Story : प्रेयसीसोबत पतीला पत्नीनेच रंगेहाथ पकडले, विवाहित महिलेचे किंवा पुरुषाचे अनैतिक संबंध, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्या तुम्ही वाचल्या असतीलच. अशीच एक घटना समोर आली असून, एका विवाहित महिलेचे सात वर्षांपासून एका पुरुषाशी अनैतिक संबंध होते. मात्र, तिने तिच्या प्रियकराला जवळच्या एका मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात.

पोलीस सूत्रानुसार, यशोदा नावाच्या महिलेचे दोन मुले असूनही विश्वनाथ नावाच्या ऑडिटरशी अवैध संबंध होते. यशोदा आणि विश्वनाथ शेजारी राहत होते, त्यामुळे त्यांचे नाते पहिल्याच नजरेत फुलले.

त्यांच्या नात्याला तब्बल सात वर्ष झाली होती, परंतु अलीकडेच यशोदाने तिच्या मैत्रिणीची ओळख तिच्या प्रियकर विश्वनाथशी करून दिली. त्यानंतर यशोदासोबत सात वर्षांपासून संबंध असलेल्या विश्वनाथने तिच्या मैत्रिणीला गुप्तपणे भेटायला सुरुवात केली.

दरम्यान, यशोदा हळूहळू दोघांवरही संशय घेऊ लागली. एके दिवशी तिला कळले की विश्वनाथ आणि तिच्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध आहेत आणि ते आदल्या रात्री लॉजमध्ये एकत्र होते.

लॉजवर पोहोचल्यावर यशोदाने त्यांना रंगेहाथ पकडले. तिघांमध्ये वाद झाला. यशोदाने संतापून त्याच हॉटेलमध्ये तिच्या प्रियकराच्या शेजारी एक खोली बुक केली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. बंगळुरूतील बसवेश्वर नगर येथील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉजमध्ये ही घटना घडली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---