---Advertisement---
Extramarital affair : आजकाल आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे हे सामान्य झाले आहे. लग्नानंतरही बरेच लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात, अर्थात इतर महिलेशी अफेअर ठेवतात.
आता अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे विवाहित असूनही त्याने अविवाहित असल्याचं भासवलं आणि एक प्रेयसी एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
दरम्यान, सोशल मीडियावर भांडण झाल्याने प्रेयसी अचानक मध्यरात्री त्याच्या घरात धडकली. त्यानंतर जे काही घडलं त्याने पोलिसही थक्क झाले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात.
वृत्तानुसार, अजयची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे प्रियाशी मैत्री झाली. ते सतत संवाद साधत राहिले आणि ही मैत्री लवकरच प्रेमात बदलली. तो आधीच विवाहित होता, ही गोष्ट त्याने लपवून ठेवली. असे वृत्त आहे की अजयने प्रियाशी लग्न करण्याचे वचन दिले होते.
दरम्यान, इंस्टाग्रामवर झालेल्या भांडणानंतर प्रिया थेट मध्यरात्री त्याच्या घरात प्रवेश केला. त्याच्या पत्नीला तिथे पाहून ती संतापली. दोन्ही महिलांमधील वाद शारीरिक हाणामारीत रूपांतरित झाला.
पत्नीने तिच्या पतीला हस्तक्षेप करण्यासाठी सांगितले, असता प्रेयसी महिला आणखी संतप्त झाली. तिने नियंत्रण कक्षाला फोन केला आणि सांगितले की एका महिलेला तिच्या पतीने त्रास दिला आहे आणि तिने आत्महत्या केली आहे. कृपया लवकर या.” घटनास्थळी पोहोचलेले पोलीस सत्य जाणून थक्क झाले.
सत्य जाणून पोलिसांनाही बसला धक्का
पोलीस आले आणि रात्री १:३० वाजेपर्यंत तपास केला, पण घरात सर्व काही ठीक असल्याचे आढळले. कोणीही जखमी झाले नाही. जेव्हा संपूर्ण कहाणी समोर आली तेव्हा पोलिसही थक्क झाले. उत्तर प्रदेशच्या बेतियाहाता येथे हा प्रकार घडला असून, या प्रकरणात कोणीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.









