---Advertisement---
Chandrika Chaudhary : “हरेश, मला वाचव… घरचे माझ्या इच्छेविरुद्ध दुसरीकडे लग्न लावत आहेत. मी लग्नाला तयार झाले नाही, तर ते मला ठार मारतील” असा मेसेज प्रेयसीने प्रियकराला केल्यानंतर अवघ्या काही तासांत तिचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रिका चौधरी असे तरुणीचे नाव असून, तिचा मृत्यू नसून, तिची हत्या करण्यात आली आहे, आरोप प्रियकर हरेश याने केला आहे.
सूत्रानुसार, हरेशने सांगितले की दोघेही Live-in relationshipमध्ये राहत होते, मात्र तिच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. तिचे कुटुंबिय तिचं दुसरीकडे लग्न लावून देतील, हे तिला माहिती होतं. त्यामुळेच तिने रात्री उशिरा त्याच्या इन्स्टाग्रामवर हा मेसेज केला होता. त्यानंतर काही तासांत तिचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी सांगतिले की, प्रथम आत्महत्या असल्याचे वाटलं, पण हरेशने केलेल्या पोलिस तक्रारीमुळे तपासाचा मार्ग मोकळा झाला. चंद्रिकाचे वडील सेधाभाई आणि काका शिवाभाई पटेल यांनी तिची हत्या केल्याचा आरोप हरेशने केला. तिचे वडील फरार असून दोघा काकांना अटक करण्यात आली आहे.
पूर्वनियोजित खून
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात ही घटना घडली असून, चंद्रिकाचे वडील आणि काकांनी तिचा पूर्वनियोजित खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चंद्रिका काही दिवस आधी हरेशसोबत घरातून निघून गेली होती, परंतु तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यामुळे तिला शोधून, घरी परत पाठवले , अशी माहितीही पोलिसांनी दिली.
---Advertisement---