---Advertisement---
गोमातेला ‘राष्ट्रीय माते’चा दर्जा द्या अशी मागणी काँग्रेस खासदार गेनिनीबेन ठाकोर यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता, संत आणि गोशाळा ट्रस्ट हे सर्व एकमुखी मागणी करीत आहेत. त्यांनी गुजरात सरकारला किमान राज्य पातळीवर तरी ‘गो मातेला’ ‘राज्यमाते’चा दर्जा देण्याचे आवाहन केले आहे.
गेनिनीबेन ठाकोर म्हणाल्या, “संपूर्ण देशातील लोकांची हीच मागणी आहे. संत, ऋषी आणि गोमातेचे अनुयायी, गोशाळा विश्वस्त, सर्वांची एकच मागणी आहे की गोमातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा देण्यात यावा. मी लोकसभेत देखील गो मातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्रातही गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला.
काँग्रेस खासदार गेनिनीबेन ठाकोर यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी या मुद्द्यावर अधिकृत कारवाई केली आहे. खासदार ठाकोर म्हणाल्या, मी कच्छ जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहिले आहे. सर्व संत आणि ऋषी एकच मागणी करत आहेत की गो मातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा द्यावा.
काँग्रेस खासदार गेनिनीबेन ठाकोर म्हणाल्या की किमान गुजरात सरकारने तरी गो मातेला राज्य मातेचा दर्जा द्यावा. ही जनतेची मागणी आहे आणि या मागणीसह, मी देखील ही मागणी करणाऱ्या संत आणि गुजरातच्या जनतेसोबत उभी आहे.”
गेन्नीबेन ठाकोर म्हणाल्या की या मुद्द्यावर त्या एकट्या नाहीत, तर सामान्य जनताही त्यांच्यासोबत आहे. त्या म्हणतात की जनतेच्या भावनांचा आदर करून सरकारने या दिशेने पावले उचलली पाहिजेत.