रक्षाबंधनाला द्या ‘हे’ खास गिफ्ट

तरुण भारत लाईव्ह । २४ ऑगस्ट २०२३। राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन  हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते.‘रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. बहीण भावाला राखी बांधल्यावर तिला काही विशेष भेटवस्तू द्यायची असेल तेही आपल्या बजेटमध्ये तर हे काही पर्याय आहेत.

पर्स
पर्स ही प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे. एम्ब्रॉयडरी पर्स ह्या बाजारात २०० रुपयांपासून सहज उपलब्ध होतात. हा गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

झुमके
प्रत्येक मुलीला झुमके हे आवडतातच. सिल्वर, गोल्डन, अशा बऱ्याच रंगांमध्ये हे बाजारात मिळतात. हा गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.

ड्रेस
ड्रेस तर सगळ्यांनाच आवडतात. पंजाबी, वेस्टर्न, अशा बऱ्याच प्रकारचे ड्रेसेस तुम्ही बहिणीला रक्षाबंधन च गिफ्ट देऊ शकता.