शालेय विद्यार्थ्याला लिफ्ट देताय? सावधान! पाचोऱ्यामध्ये जे घडलंय ते वाचून तुम्हालाही येईल ‘संताप’

---Advertisement---

 

पाचोरा, प्रतिनिधी : प्रवास करताना रस्त्यात कुणी लिफ्ट मागतंय हे पासून आपण माणुसकीच्या भावनेतून वाहन थांबवतो…मात्र माणुसकीच्या भावनेला वेदना देईल, अशी एक घटना समोर आली आहे. जिथे एका दुचाकी स्वराला शालेय विद्यार्थ्याला लिफ्ट देणे महागात पडले आहे. विद्यार्थ्याने भरदिवसा दुचाकी स्वराच्या बॅगेतून 47,500 रुपयांची रोकड लंपास केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित विद्यार्थास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पूर्ण रक्कम जप्त केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, शहरातील गंगा सुपर शॉप येथे कार्यरत अकाउंटंट हा भडगाव रोडवरून शॉपकडे दुचाकीवरून येत होता. दरम्यान, मंगल प्रोव्हिजन जवळ एका शालेय विद्यार्थ्याने भुयारी मार्गापर्यंत लिफ्ट मागितली. अकाउंटंटने दुचाकी थांबवून त्यास बसविले मात्र, भुयारी मार्ग जवळ येताच त्याने पुन्हा दुचाकी स्वाराला ”तुम्ही कुठं जात आहात”, असे विचारले. अकाऊंटंटने गंगा सुपर शॉपचे नाव सांगितले.

विद्यार्थी भुयारी मार्ग जवळ न उतरता गंगा सुपर शॉप जवळील रस्त्यावर उतरला व पुढे निघून गेला. दरम्यान अकाउंटंट मॉलमध्ये पोहचताच बॅगेची चैन उघडी दिसली. बॅगेतील रक्कम पाहता आढळून न आल्याने मॉलचे मालक यांना हा प्रकार सांगितला. शेजारील दुकानावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता एक शालेय विद्यार्थी आढळून आला. शालेय ड्रेसवरून त्या शाळेत जाऊन खात्री केली असता फुटेसमधील विद्यार्थी आढळून आल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायल यांनी विद्यार्थ्याची चौकशी केली. चोरीची रक्कम ही मानसिंगका इंडस्ट्रीज समोरील कब्रस्तानमध्ये फेकल्याचे सांगितले, मात्र या ठिकाणी पोलिसांना रक्कम आढळून आली नाही. दरम्यान, शेजारीच असलेल्या महाराष्ट्र गादी भांडारवरील युवकास विचारले असता त्याने रक्कम काढून दिली असून, पोलिसांनी ती दुचाकी स्वार अकाउंटंट यास सुपुर्द केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायल यांनी शालेय विद्यार्थ्याला समज देऊन सोडून देण्यात आले असून विद्यार्थी हा पाचोरा तालुक्यातील असल्याचे समजून आले आहे. दरम्यान गुरुवार रोजी पाचोरा शहरातील या प्रकाराने शालेय विद्यार्थ्यांनाही मोटर सायकलवर बसवताना मोटर सायकल स्वार यांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---