आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक एकी गरजेची

नवी दिल्ली : सध्या सारे जग एकमेकांशी जोडलेले असताना आपत्तींचा प्रभाव फक्त स्थानिक राहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद एकाकी न ठेवता एकीकृत केला पाहिजे आणि त्यासाठीच आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा (सीडीआरआय) निर्माण करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीआरआयच्या ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना केले.
अवघ्या काही वर्षांत, प्रगत आणि विकसनशील देशांतील, लहान-मोठे, जगाच्या दक्षिण किंवा उत्तर भागातले 40 हून अधिक देश सीडीआरआयचा भाग बनले आहेत. सरकार व्यतिरिक्त, जागतिक संस्था, खाजगी क्षेत्रे आणि तज्ञ देखील यात सहभागी आहेत हे उत्साहवर्धक आहे. आपत्तींना तोंड देऊ शकतील अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्थानिक ज्ञानाचा हुशारीने वापर व्हायला हवा. स्थानिक अंतर्दृष्टी असलेले आधुनिक तंत्रज्ञान लवचिकतेसाठी उत्तम ठरु शकते. भविष्यात चांगल्या प्रकारे दस्तऐवजीकरण केल्यास, स्थानिक ज्ञान ही सर्वोत्तम जागतिक पद्धत बनू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सीडीआरआयच्या काही उपक्रमांचा समावेशक उद्देशांवर पंतप्रधानांनी लक्ष वेधले. बेट असलेल्या अनेक राष्ट्रांना इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलिएंट आयलंड स्टेट्स उपक्रमांचा लाभ होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलिन्स एक्सीलरेटर निधीवरही त्यांनी भाष्य केले. या 50 दशलक्ष डॉलर निधीने विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रचंड रुची निर्माण केली आहे. आर्थिक संसाधनांची बांधिलकी ही उपक्रमांच्या यशाची गुरुकिल्ली आहे”, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.