वेध
– अनिरुद्ध पांडे
आजपासून बरोबर 21 वर्षांपूर्वी, 27 फेब्रुवारी 2002 या दिवशी गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील (Godhra fire) गोध्रा रेल्वेस्थानकावर घडलेल्या एका भयंकर घटनेत 59 रामभक्तांना रेल्वेच्या एका डब्यासह जाळून टाकण्यात आले. 24 पुरुषांसह 15 स्त्रिया आणि 20 लहान मुलांसह जळून खाक झालेले हे 59 जण हिंदू विश्व हिंदू परिषदेने राममंदिराच्या उभारणीसाठी केलेल्या पूर्णाहुती महायज्ञास हजेरी लावून परतत होते. भोपाळहून अहमदाबादला जाणार्या साबरमती एक्सप्रेसमधील एस-6 या डब्यात गुजरातच्या गावांमधील रामभक्त परिवार होते. ‘त्या’ 27 फेब्रुवारीला सकाळी पावणेआठच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकावरून निघालेली ही गाडी एक-दोन किलोमीटर अंतरावर जाऊन थांबली आणि काही क्षणांतच हा डबा आगीने वेढला गेला. भारत देशाच्या इतिहासातील माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना अत्यंत थंडपणे गोध्रा परिसरातील मुसलमानांनी पूर्वनियोजित पद्धतीने घडवून आणली. हा विशिष्ट डबा एकदमच भडकावा; त्यातील कोणालाच बचावाची संधी मिळूच नये अशा पद्धतीने पेट्रोलसारखे ज्वालाग्रही पदार्थ टाकून पेटवण्यात आले. या रामभक्तांना कोणतीही मदत मिळू नये म्हणून हा प्रकार गोध्रा स्थानकावर न करता निर्जन ठिकाणी रेल्वे थांबवून करण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील (Godhra fire) गोध्रा या शहराचा पूर्वेतिहास मुसलमानांच्या उपद्रवी कारवायांसाठी प्रसिद्ध असल्याचे या निमित्ताने उजागरही झाले होते.
गोध्रा परिसरातील (Godhra fire) मुस्लिम समुदायाने 1948, 1953, 1955, 1985 या वर्षांमध्ये निर्माण केलेले सांप्रदायिक तणाव शांत करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. 1965 व 1980 मध्येही या ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या. कट्टरता जोपासणार्या या परिसरातील मुसलमानांनी हेतुपुरस्सर हे कृत्य केले, असेही सांगितले गेले. ‘या’ डब्यातील काही रामसेवकांचा गोध्रा रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान डब्याला आग लावण्यात झाले, असेही एक कथानक मुस्लिम आणि काही पुरोगाम्यांकडून मांडले गेले. पण रेल्वे स्थानकापासून दोनच किलोमीटर अंतरावर आणि पाच-दहाच मिनिटांनी मोठ्ठा जमाव, आग लावणार्या वस्तूंसह कसा काय जय्यत तयार असतो, या मुद्याचा खुलासा ते कोणीच करू शकले नव्हते. 27 फेब्रुवारीला हे जळीतकांड घडल्यानंतर लगेच, म्हणजे 6 मार्च 2002 रोजी गुजरात सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. जी. शहा यांची चौकशी समिती नेमली. पण न्या. शहांची भारतीय जनता पार्टीशी जवळीक असल्याचा आरोप करून गुजरातमधील विरोधी पक्ष काँग्रेस आणि काही पुरोगाम्यांनी न्या. शहा समितीवर आक्षेप नोंदवला. त्यामुळे 22 मार्च 2002 ला गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी. टी. नानावटी यांच्या अध्यक्षतेत नवी समिती नेमली. विशेष म्हणजे, या समितीने 2008 मध्ये दिलेल्या आपल्या पहिल्या अहवालात गोध्रा अग्निकांड हा (Godhra fire) अपघात नसून पूर्वनियोजित कटच होता, असा निष्कर्ष काढला होता. विशेष म्हणजे काही तथाकथितांनी या घटनेचा ठरवूनच ‘अग्निकांड’ असा, म्हणजे अपघात या अर्थाने उल्लेख सातत्याने केला. पण ते ‘हत्याकांड’च होते, हे विविध पुराव्यांनी स्पष्ट केलेे.
हे सर्व सुरू असतानाच तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश यू. सी. बॅनर्जी समिती नेमली. या समितीने मात्र गोध‘ात रेल्वेला लागलेली आग हा (Godhra fire) एक अपघात होता, असा निष्कर्ष काढला. पण या अहवालाला गुजरात पोलिस महासंचालक आणि त्या अग्निकांडातून बचावलेल्या नीळकंठ भाटिया यांनी बॅनर्जी समितीच्या नियुक्तीलाच आव्हान दिले होते. त्यावर गुजरात उच्च न्यायालयाचे न्या. बी. एच. वाघेला यांनी न्या. बॅनर्जी समितीची नियुक्ती अवैध असल्याचा निर्णय दिला. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांवर बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावर अहवाल मिळवून त्याचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यामुळे न्या. बॅनर्जी समितीचा अहवालही वादग‘स्त ठरला. या प्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने 123 आरोपींवर ‘टाडा’ लावण्याची मागणी केली. पण अखेर सर्व चाळण्या लागून एकूण 94 आरोपींवर खटला चालला. त्यापैकी 31 जणांना दोषी आणि 63 जणांना निर्दोष मुक्त करण्याचा निकाल अहमदाबाद विशेष न्यायालयाने 1 मार्च 2011 रोजी दिला. ‘59 जणांना जाळून टाकणार्या’ दोषी 31 आरोपींपैकी 11 जणांना फाशी व 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या निकालानंतर पुढे 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा झालेल्या 11 आरोपींची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली. यातील आणखी एक विशेष म्हणजे, या (Godhra fire) अग्निकांडातील फरार मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक या घटनेनंतर चक्क 19 वर्षांनी पोलिसांना सापडला होता. हा घटनेनंतर पळून गेला, तो एकदम फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा गोध्रा येथेच आला असताना सापडला. आहे की नाही कमाल फरार होण्याची आणि त्याला शोधणार्यांचीही..!
– 98817 17829