---Advertisement---
जळगाव : जामनेर तालुक्यातील गोदरी येथे जळगाव वनविभागांतर्गत वन पर्यटन क्षेत्रात विकास कामे करण्यात आली आहेत. या वन पर्यटन क्षेत्राचे उद्घाटन ग्रामविकास तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, उद्घाटनपूर्वीच डालकी धबधब्यासह अन्य निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी विविध जिल्ह्यातून पर्यटक दाखल झाले असल्याचे माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली.
जामनेर तालुक्यातील गोदरी येथे जळगाव वनविभागांतर्गत वन पर्यटन क्षेत्रात विकास कामे करण्यात आली आहेत. यात वन उद्यान, त्यातील नदी नाले परिसरात नैसर्गिक साहित्याचा वापर करीत लाकडी सिमेंटचे पूल, लहान मुलांसाठी खेळणी, मचाण आदी साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या वन पर्यटन क्षेत्राचे उद्घाटन ग्रामविकास तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, उद्घाटनपूर्वीच डालकी धबधब्यासह अन्य निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी विविध जिल्ह्यातून पर्यटक दाखल झाले असल्याचे माहिती जळगाव उपवनसंरक्षक प्रवीण ए. यांनी दिली.
लाकडी सिमेंटचे पूल अन् बरच काही…
वन उद्यान, त्यातील नदी नाले परिसरात नैसर्गिक साहित्याचा वापर करीत लाकडी सिमेंटचे पूल, लहान मुलांसाठी खेळणी, मचाण आदी साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे.