जळगाव सुवर्णनगरीत सोने-चांदी पुन्हा महागली ; काय आहे प्रति तोळ्याचा भाव??

जळगाव : मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार दिसून आला. आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीची वाधरली आहे. यामुळे जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 57000 रुपयावर गेला आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 55 हजारावर आला होता. मात्र गेल्या तीन दिवसात त्यात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 57,200 रुपयावर गेला आहे. गेल्या आठवड्यात सोने जवळपास 150 रुपयांनी महागले असल्याचे दिसून आले.

तर दुसरीकडे चांदी 64,200 रुपये प्रति किलो इतका आहे. मागील आठवड्यात चांदीच्या किमतीत जवळपास 3000 हजार रुपयांची घसरण दिसून आलीय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दरम्यान गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59000) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर घसरण दिसून आली होती, परंतु आता सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे.