---Advertisement---
---Advertisement---
Gold-Silver Rate : आज देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. जळगावसह दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या शहरांमध्ये आज सोने १०४० रुपयांनी महाग झाले असून, ते विक्रमी पातळीवर पोहोचले, तर चांदीच्या किमतीतही १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात प्रति तोळा ११३३ रूपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो २०६० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे विनाजीएसटी सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा ओलांडला असून, चांदीने नवीन विक्रम गाठला आहे. दरम्यान,सोने आणि चांदी दररोज नवीन उच्चांक निर्माण करत असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
देशभरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,०२,३४० रुपयांवर पोहोचला आहे, जो २३ जुलै रोजी १,०१,३०० रुपयांवर होता. म्हणजेच एका दिवसात १०४० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोने आता प्रति १० ग्रॅम ९३,८१० रुपयांवर पोहोचले आहे, तर १८ कॅरेटचा दर ७६,७६० रुपयांवर पोहोचला आहे.
दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०२,४९० रुपये दराने उपलब्ध आहे, तर मुंबई आणि कोलकातामध्ये ते १,०२,३४० रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये आज सोने १,०२,३४० रुपये दराने पोहोचले आहे, जे आतापर्यंतचे सर्वोच्च पातळी आहे.