---Advertisement---

Jalgaon News : चोरट्यांचा धुमाकूळ; आधी घराची भिंत फोडली, मग चोरले सोन्याचे-चांदीचे दागिने

---Advertisement---

अमळनेर : वृध्द महिलेच्या घराची भिंत फोडून घरातून रोख रकमेसह सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ९९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील शिरूड गावात शंकुतलाबाई दुर्योधन पाटील वय ६० या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २८ जून रोजी रात्री १० वाजता जेवण करून घरातील सर्वजण झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची भिंत फोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ९९ हजारांचा ऐवज ठेवलेली लोखंडी पेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

दुसऱ्या दिवशी शनिवारी २९ जून रोजी पहाटे ४ वाजता शकुंतलाबाई आणि त्यांची सुन या उठल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता शकुंतलाबाई यांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment