तरुण भारत लाईव्ह । ६ एप्रिल २०२३। आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजेच कालपेक्षा आज सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. दुसरीकडे चांदीही घसरली आहे.
जळगाव सुर्वण नगरीत आज गुरुवारी सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ६०,७०० रुपये (विना जीएसटी) इतका आहे. आज ४०० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.काल सोन्याचा भाव ६१ हजार रुपयांवर गेला होता.
सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने १९ मार्च रोजी ६०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सोन्याचा भाव ५९,००० ते ६२,००० रुपयांच्या दरम्यान खेळत होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसात सोन्याच्या किमतीने ६१ हजाराचा टप्पा ओलांडला आहे..
दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत कालच्या किमतीपेक्षा घसरण दिसून येतेय. आज चांदीचा प्रति किलोचा दर ७४,५०० रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तो काल बुधवारी सकाळी ७५००० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात ५०० रुपयाची घसरण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव ७४,००० रुपयावर गेला होता. चांदीचे आता हा रेकॉर्ड देखील मोडला आहे.
हे आहे सोने-चांदी दरवाढीचे कारण?
सोन्याच्या दरातील वाढीमागे अमेरिकेसह इतर देशांमधील बँकिंग क्षेत्रावर आलेले संकट कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेसह युरोपातील बँकांची स्थिती बिकट झाली आहे. डॉलर कमकुवत झाला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता आहे. त्याचा फायदा सोन्यासह चांदीत गुंतवणुकीला होत आहे. त्यामुळे सोने वधारले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरांत चढ-उतार सुरू आहे.