---Advertisement---
---Advertisement---
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज २८ जुलैला पुन्हा सोन्याच्या किमतीत ५०० रुपयांची घट झाली असून, २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने, तर चांदी १,१५,९०० रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांना काहीचा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने ९९,९७० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९१,७४० रुपये आणि १८ कॅरेट सोने ७५,०६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर, आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपयांच्या दराने व्यवहार करत आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,५९० रुपये आहे. तर १८ कॅरेट सोने ७४,९४० रुपयांच्या दराने व्यवहार करत आहे.
याशिवाय, चंदीगड, आग्रा, अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोने ९९,९७० रुपयांच्या दराने, तर चंदीगड आणि आग्रामध्ये २२ कॅरेट सोने ९१,७४० रुपयांच्या दराने, तर चंदीगड आणि आग्रामध्ये १८ कॅरेट सोने ७५,०६० रुपयांच्या दराने व्यवहार करत आहे.