---Advertisement---

Gold-Silver Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीत घसरण, जाणून घ्या दर

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. जळगाव सुवर्णपेठेत आज रविवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने दर विनाजीएसटी ९८,५०० (जीएसटीसह १०१४५५) रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दरम्यान, मागच्या तीन दिवसात सोने दरात २३०० रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. तर चांदी दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख १३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोने १,००,०८० रुपये प्रति १० ग्रॅम दराने, तर २२ कॅरेट सोने ९१,७५० रुपयांवर व्यवहार करत आहे.
आर्थिक राजधानी मुंबई तसेच चेन्नई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ९९,९३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९१,६०० रुपये आहे.

याशिवाय, जयपूर, चंदीगड आणि लखनऊमध्ये २४ कॅरेट सोने १,००,०८० रुपयांना विकले जात आहे. भोपाळ आणि अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९,९८० रुपये आहे, तर हैदराबादमध्ये ते ९९,९३० रुपयांवर व्यवहार करत आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने ९१,६०० रुपयांना विकले जात आहे, तर जयपूर, चंदीगड आणि लखनऊमध्ये २२ कॅरेट सोने ९१,७५० रुपयांना विकले जात आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २२ कॅरेट सोने ९१,६५० रुपयांना आणि हैदराबादमध्ये ते ९१,६०० रुपयांना विकले जात आहे.

काय आहे कारण

भू-राजकीय तणावात घट आणि जपान, ब्रिटनसह अनेक देशांशी अमेरिकेचा व्यापार देखील सोन्याच्या किमती घसरण्याचे प्रमुख कारण बनल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment