---Advertisement---
जळगाव : चार दिवस मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचे भाव १ लाख १२ हजार ५०० रुपयांवर आले असून, सोन्याच्याही भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ९८ हजार २०० रुपयांवर आले आहे.
१३ जुलैचा अपवाद वगळता १० जुलैपापासून दररोज चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे १४ जुलैपर्यंत चांदीचे भाव १ लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर मात्र चांदीत थेट २ हजार रुपयांची घसरण झाली व ती १ लाख १२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. हे भाव पुन्हा तीन दिवसांपूर्वीच्या भावावर आले आहेत. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ९८ हजार २०० रुपयांवर आले आहे.
दरम्यान, काल मंगळवारी जळगाव सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा ९०,४७८ रुपये, तर २४ कॅरेट सोने दर ९८,७०० रुपये (जीएसटीसह १०१६६१) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले होते.
विशेषतः चांदीने या दर वाढीने इतिहास रचला होता. दरम्यान, चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण झाली असून, भाव १ लाख १२ हजार ५०० रुपयांवर आले आहे.