---Advertisement---
Gold Rate : श्रावण महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोने ४९० रुपयांनी स्वस्त होऊन ९९,२७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे, तर चांदी १००० रुपयांनी घसरून १,१३,९०० रुपये प्रति किलो झाली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत दोन दिवसात सोने दरात ७०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी दरात जवळपास २ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी मात्र सोने चांदीचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे.
आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,२७० रुपये झाली आहे, जी काल म्हणजेच १६ जुलैला ९९,७६० रुपये होती. म्हणजे ४९० रुपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,९९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७४,४५० रुपयांवर आला आहे.
चांदीही झाली स्वस्त
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घट झाली आहे. चांदीच्या किमतीत प्रति किलो १००० रुपयांची घसरण झाली असून, आज चांदीचा दर १,१३,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. काही शहरांमध्ये चांदीचा भाव यापेक्षा थोडा जास्त आहे, परंतु एकूणच बाजारात चांदीही स्वस्त झाली आहे.