Gold Rate : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीच्या भावात एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी एक लाख ३१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात ७५० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ११ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहे.

दिल्लीत २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १,११,४८० रुपये आहे. तर, १ किलो चांदीची किंमत १,११,४८० रुपये आहे. मुंबईतही सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीप्रमाणेच, सोने आणि चांदीच्या किमती अनुक्रमे प्रति १० ग्रॅम १६० रुपये आणि प्रति किलो २००० रुपये वाढल्या आहेत.

दरम्यान, एमसीएक्स सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणाऱ्या सोन्याच्या करारासाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव सध्या ३३९ रुपयांनी वाढून १०९,३९१ रुपयांवर आहे. दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी संपणाऱ्या चांदीच्या वायदा करारासाठी चांदीचा भाव सध्या प्रति किलोग्रॅम १,३२९ रुपयांवर आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---