तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. अशा कालावधीत सोन्या-चांदीचे भाव स्थिर होते. जर तुम्हाला सोनं-चांदी खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
सराफ बाजारात 22 मे रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,530 रुपये, तर चांदीचा भाव 79,000 रुपये प्रति किलो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोने आणि चांदीचे भाव स्थिर झाले असून आज चांदी 79,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल ही चांदीचा दर तितकाच होता.
त्याचबरोबर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव काल संध्याकाळी 57,650 रुपये होता. काल 60,530 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने 24 कॅरेट सोने खरेदी केले. आजही त्याची किंमत 60,530 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.